महाराष्ट्रातील सर्व कलाकारांचे व कुटुंबीयांचे आणि कला पार्टीचे नोंदणी अभियान

कलाकारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
कलाकार कुटुंब कल्याण मंडळ, महाराष्ट्र तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील सिने कलाकार, वेब सिरीज कलाकार ते तंत्रज्ञ सर्व लोक कलाकार, बँड पथक कलाकार, बॅन्जो पार्टी कलाकार, तमाशा कलावंत, जागरण गोंधळ कलाकार, ऑर्केस्ट्रा कलाकार, असे महाराष्ट्रातील व्यावसायिक व लोक कलाकार आणी सिनेमा कलावंत, नाट्य कलाकार त्यांच्या कुटुंबीयांची कलाकार कुटुंब कल्याण मंडळातर्फे नोंदणी करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्रातील सर्व कला पायांची नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. सदर नोंदणीमुळे भविष्यात कलाकारांना ऑनलाइन आणि वेबसाईट द्वारे काम मिळण्यासाठी आणि त्यांना डिजिटल
प्रवाहात आणण्यासाठी नोंदणीचा उद्देश आहे.
तसेच त्यांना बैंक अकाउंट द्वारे मानधन घेणे विषयी जागृत केली जाणार आहे. व त्यांचे आयटी रिटर्न्स भरून आर्थिक साक्षर केले जाणार आहे. जेणेकरून कोणत्याही कलाकाराला भविष्यात सावकारी व्याज न घेता बँकेतून कर्ज घेता यावे यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
सर्व कलाकारांची नोंद घेऊन अनुभवी आणि क्योवृद्ध कलाकारांना कला क्षेत्रात नवीन पिढी घडवण्यासाठी यांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व कलाकारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. कलाकारांच्या कुटुंबातील सदस्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणे, शिक्षण घेत असलेल्या गरीब कलाकारांच्या मुलांना आर्थिक पाठबळ देणे तसेच रोजगार मेळावे भरवणे यासाठी कलाकारांच्या कुटुंबातील सदस्यांची ही नोंदणी आवश्यक असल्याने त्याची नोंदणी करून घेण्यात येईल असे कलाकार कुटुंब कल्याण मंडळाचे सचिव श्री प्रा. सखाराम धुमाळ यांनी सांगितले.
कलाकार कुटुंब कल्याण मंडळाचे गाव तिथे कला शाखा या उपक्रमातून अनेक गावात शाखा सुरू झाल्याचे अध्यक्ष श्री लहु ढवळे यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून या नोंदणी अभियानास सुरुवात होईल तसेच प्रत्येक जिल्ह्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल तरी सर्व कलाकारांनी आपली व आपल्या कुटुंबाची नोंदणी करून घेण्याचे आवाहन या द्वारे करण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी कलाकार कुटूंब कल्याण मंडळाच्या 8080806878 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. लहू ढवळे यांनी केले आहे.
कणकवली/ प्रतिनिधी