हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा.. अन्यथा आंदोलन छेडणार

सावंतवाडी

आंबोली ग्रामस्थांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर

तालुक्यातील आंबोली परिसरात गेलें चार पाच दिवस हत्तीने धुमाकूळ घातला असून भात शेतीसह ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.हे हत्तीने आपला मोर्चा वाड्या व वास्त्या मंध्ये, घरा शेजारी शेजारी वळवला असल्यामुळे ग्रामस्थ मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत कित्येक वेळा वन विभागाला कळवले असून सुद्धा ठोस उपाययोजना झाले नसल्याने आज येथील शेतकऱ्यांनी आंबोली वन विभागाला भेट देऊन हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा नाहीतर आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारचा आक्रमक पवित्र घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले
यावेळी सरपंच सौ सावित्री पालेकर संतोष पालेकर भिसाजी गावडे रामा पडते श्री नाईक, उमेश पडते, विलास गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!