डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत हळवल स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम.

कणकवली/मयूर ठाकूर.

महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा मार्फत श्रीसमर्थ बैठक हळवल येथील श्रीसदस्यांनी दिनांक १ ऑक्टबर २०२३रोजी केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वच्छ भारत मिशन उपक्रम चा एक भाग आणि एक दिवस स्वच्छतेसाठी एक दिवस देशासाठी हा हेतू ठेऊन हळवळ स्मशानभूमी येथे सकाळी १० वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात ३६ श्रीसदस्य सहभागी झाले होते.सुमारे २ टन ओला कचरा संकलित करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.सदर उपक्रमाच्या ठिकाणी गावचे सरपंच देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!