वाघेरीतील मंदिरा मधील घंटा व पितळेच्या समई सह अन्य साहित्य चोरीस

12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास

कणकवली पोलीस निरीक्षकांची घटनास्थळी भेट

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री देव लिंगेश्वर पावणादेवी गांगोमाऊली व पूर्वस मंदिराजवळ नवसासाठी बांधलेल्या पितळेच्या घंटा व अन्य साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 1 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्या नंतर ही चोरी झाल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत चंद्रकांत गणपत गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंदिराच्या पायरीच्या वरील बाजूस बांधलेल्या 1 पितळी घंटा तसेच मंदिराच्या तीन पितळी घंटा पैकि 2 पितळी घंटा चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच मंदिराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या 16 पितळी घंटा त्या देखील चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच मंदिरात ठेवण्यात आलेले 2 लामण दिवे व 1 पंचारती देवासमोर ठेवण्यात आलेल्या पितळी समई, पितळी धुपारती हाताने वाजवण्याच्या 2 लहान पितळी घंटा मिळून 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. ह्या प्रकरणी फिर्यादीने गावातील ग्रामस्थांना कल्पना देत या संदर्भात पोलिसात तक्रार केली. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!