संतोष ओटवणेकर यांना “विद्यार्थी मित्र २०२३” ने सन्मानीत.

कणकवली/ मयुर ठाकूर.

श्री. संतोष ओटवणेकर यांना नुकताच “विद्यार्थी मित्र पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार “नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ येथील नियोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. श्री. संतोष ओटवणेकर हे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. “नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली” ह्या मंडळाचे ते अध्यक्ष म्हणून काम करत असताना सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात ओटवणेकर यांच योगदान नेहमीच उल्लेखनीय असतं. कोरोना काळात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊन , पूरग्रस्तांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून, तसेच दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये वास्तुरूपात मदत करून त्यांनी एक चांगला आदर्श ठेवला आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाच असतं आणि याच त्यांच्या योगदानाचं महत्त्व लक्षात घेत “नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग” यांच्यावतीने त्यांना “विद्यार्थी मित्र पुरस्कार” प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. काल दिनांक ०१ ऑक्टोबर, 2023 रोजी कुडाळ येथे संस्थेच्या झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेचे राज्य सचिव बापू परब तसेच, जिल्हा अध्यक्ष प्रदीप सावंत, जिल्हा संघटक पंढरी जाधव, जिल्हा संघटक श्री. संजय पिळणकर तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!