सबसे कातील..”गौतमी पाटील” कणकवली, कुडाळ मध्ये येणार

चला हवा येउ द्या चे कलाकार पण असणार कॉमेडी ची धम्माल घेऊन

“गौतमी पाटील” च्या जिल्हा दौऱ्याची उत्सुकता

देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील व ड्रेयस एवेंट्स तर्फे गौरव मुंज यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली आणि कुडाळ येथे कॉमेडी चे सुपरस्टार’ व “गौतमी पाटील डीजे डान्स शो या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.फक्त ८०० प्रेक्षकांना प्रवेश असेल.मराठा समाज हॉल कुडाळ व वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे हे लोकप्रिय कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत.
कुडाळ येथे मराठा समाज हॉल येथे ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता व वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे सायंकाळी ५ वाजता कॉमेडी सुपरस्टार विनोदी कार्यक्रम सुप्रसिद्ध नामवंत कलाकार डॉ. नीलेश साबळे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, स्नेहल शिडम, रोहित चव्हाण आणि आपले कोकणचे सुपुत्र भालचंद्र उर्फ भाऊ कदम ३ तासांचा विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत.
तसेच ८ ऑक्टोंबर रोजी कुडाळ येथे मराठा समाज हॉल येथे सकाळी ११ वाजता व वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध कलाकार गौतमी पाटील डीजे डांस शो हा कार्यक्रम होणार आहे.
हे दोन्ही कार्यक्रम अतिशय शिस्तबध्द पध्दतीने आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी खाजगी व पोलीस संरक्षण ठेवण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. या कार्यक्रमासाठी कायदा आणि सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने आयोजक म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.या कार्यक्रमांचे तिकीट दर पहिले ५ रो साठी रु. १५०० रुपये, मागील रो साठी १००० रुपये आहेत.कणकवली – कोहिनुर झेरॉक्स ॲंड स्टेशनरी ( 9404395024,7083724455 ) तर कुडाळ येथील बुकिंगसाठी – नेमळेकर बंधु स्नॅक्स( 9420116666 , 9834237718) यांना संपर्क साधावा,असे आवाहन देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील व ड्रेयस एवेंट्स तर्फे गौरव मुंज यांनी केले.
यावेळी चानी जाधव,परेश कांबळी,योगेश ताम्हणेकर उपस्थित होते

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कणकवली

error: Content is protected !!