पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा सत्कार

कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांचा कणकवलीतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राजेंद्र मनोहर पेडणेकर शअशोक करंबेळकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला.
या वर्षीचा श्री गणेशोत्सव व त्या जोडीने ईद ए मिलाद उल नबी एकाच वेळी संपन्न होत असताना पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वसामान्य नागरिकांना आनंदाने व उत्साहपूर्ण पध्दतीने सण साजरे करण्यात सहाय्य केले,
त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “आम्ही कणकवली कर” व “व्यापारी मित्र मंडळ “यांच्या वतीने पोलीस निरीक्षक कणकवली यांचा. हा प्रतिनिधिक गौरव करण्यात आला, श्री अमित यादव यांनी हा गौरव स्विकारला व आभार व्यक्त केले.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे दादा कुडतरकर, प्रवासी संघटनेचे मनोहर पालयेकर, निवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रकाश करंगुटकर, आणि रिक्षा संघटनेचे संजय मालंडकर उपस्थिती होते,

कणकवली (प्रतिनिधी)

error: Content is protected !!