वागदे महामार्गावर भला मोठा रानडुक्कर मृत्यूमुखी

वागदे महामार्गावर भला मोठा रानडुक्कर मृत्यूमुखी
अज्ञात वाहनाची बसली जोरदार धडक
वनविभाग दाखल, अनेकांच्या अशांवर फिरले पाणी
वागदे डगळवाडी येथे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने भला मोठा रानडुक्कर मृत्यूमुखी पडला. ही घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान यानंतर तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्री. कटके यांच्यासह वनपाल सारीक फकीर, फोडा घाट वनपाल कोळेकर, वनरक्षक अजय पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या रानडुकराला वनविभागाने ताब्यात घेतले असून, पोस्टमार्टम नंतर दिगवळे येथील वन विभागामार्फत त्याचे दफन करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. मात्र ज्यावेळी भला मोठा रानडुक्कर रस्त्यावर मृत्युमुखी पडला ही माहिती मिळतात शेकडो नागरिकांनी वागदे येथे महामार्गावर गर्दी केली होती. अनेकांनी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच आपल्याला संधी चालून आली अशा भावना व्यक्त केल्या. मात्र वन विभाग घटनास्थळी दाखल झाल्याने अनेकांच्या आशा, अपेक्षांवर पाणी फिरले.
दिगंबर वालावलकर /कणकवली