कणकवली गटविकास अधिकारी पदावर अरुण चव्हाण यांची पदोन्नतीने नियुक्ती

सध्या त्यांच्याकडेच होता अतिरिक्त कार्यभार
कणकवली पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी या पदावर सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नतीने ही नियुक्ती देण्यात आली असून, श्री चव्हाण हे सध्या कणकवली पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. मात्र गटविकास अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्यांच्याजवळ प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांची या रिक्तपदी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या या पदोन्नती बद्दल त्यांचा पंचायत समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली