देवळेकरवाडी ग्रामस्थांनी श्रमदानाने उभारला गणेश विसर्जन घाट.

देवगड /मयुर ठाकूर
महाळूंगे तालुका देवगड येथील महाळूंगे गावातील देवळेकरवाडी मधील देवळेकर,नवले,तोरसकर, आयीर,परब, पाळेकर अशी जवळपास १५० कुटुंबीय राहतात हे दरवर्षी गणेश उत्सव उत्साहात साजरा करतात परंतु बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी यांना विसर्जन घाट व पाण्यात उतरण्यासाठी रस्त्ता नव्हता याबाबत ग्रामपंचायत मधून यावर्षी काही निधी उपलब्ध होऊ शकणार नाही समजल्यावर सरपंच संदीप देवळेकर,सदस्य सुभाष नवले,साक्षी तोरसकर व श्रावणी देवळेकर यांनी पुढाकार घेवून सर्व वाडीतील ग्रामस्थांना प्रोत्साहन देवून आपण श्रमदान करून हा घाट बांधूया अनेक मदतीचे हात पुढे येतील असे आवाहन केले आणि खरोखरच पाच दिवस दररोज ६०/६५ लोकांनी एकत्र येवून हे आवाहन पूर्ण केले,यावर्षी ३० गणपतींचे विसर्जन पाच दिवसांनी या घाटावरूनच करण्यात आले.विसर्जन नंतर अनेकांनी या घाट निर्माण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला,नेहमीच शासनावर अवलंबून न राहता संघटित शक्ती अनेक कामे लीलया पार पाडू शकतात याचे हे उदाहरण आहे.