शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतले वेंगुर्ले शहरातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन

सावंतवाडी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा व वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.वेंगुर्ले पोलिस स्थानक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी श्री तांबळेश्वर भगवती गाडीअड्डा मित्रमंडळाचे अध्यक्ष समिर म्हापणकर , उपाध्यक्ष शेलार , पीआय अतुल जाधव , सुहास मांजरेकर , तेजस धारवाडकर , मकरंद वेंगुर्लेकर , निहाल केरकर , तेजस वेंगुर्लेकर , फोव कांडे आदीसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम , पोलिस निरीक्षक अतुल जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव ,
युवक अध्यक्ष संतोष परब ,वडखोल शाखाप्रमुख पडते , तुकाराम जाधव , सुरेश पाटील ,अमर कांडर , संदेश कुबल , योगेश वेंगुर्लेकर , योगेश सराफदार आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी

error: Content is protected !!