भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा भाजपा – वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

सावंतवाडी नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी प्रथमच वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली असता , तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी त्यांना नुतन कारकिर्दीस शुभेच्छा देऊन , तालुक्यांमध्ये युवकांची फळी निर्माण करावी , अशी अपेक्षा व्यक्त केली .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , हेमंत गावडे , समीर नाईक , संतोष पुजारे , समर्थ कोरगांवकर , गौरेश वायंगणकर , मारुती दोडशानट्टी , कौस्तुभ वायंगणकर , गौरव खानोलकर इत्यादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते .
रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी