चिंदरचा अथर्व सातासमुद्रापार जर्मनीत साजरा करतोय गणेशोत्सव

आचरा कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचे एक आगळे वेगळे नाते आहे. गणेश चतुर्थी आली की अंगात उत्साह संचारतो.मग तो भारतात असो की परदेशात उत्सव साजरा करण्यासाठी त्याला कुठल्या देशाची बंधने येत नाहीत. चिंदर येथील अथर्व पाताडे याने जर्मनीला आपल्या महाराष्ट्रीय मित्रांसोबत जर्मनीतीलही मित्रांना सामावून घेत पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला आणि जर्मनीत गणपती बाप्पा मोरया चा जयघोष निनादला
अथर्व पाताडे ला लहान पणा पासूनच गणेश भक्ती ची ओढ.मुंबई येथून पुढील शिक्षणासाठी जर्मनीत दोन वर्षापूर्वी गेल्यावर
गणपती बाप्पाचे भक्तगण जगामध्ये सर्व देशात पसरलेले आहेत. असाच एक भक्त मूळ चिंदर गावचा रहिवासी सचिन आणि श्रृती पाताडे सध्या रा. मुंबई यांचा मुलगाअथर्व पाताडे ला लहान पणा पासूनच गणेश भक्ती ची ओढ.मुंबई येथून पुढील शिक्षणासाठी जर्मनीत दोन वर्षापूर्वी गेला. जर्मनी मध्ये कोलोन युनिव्हर्सिटी भौतिकशास्त्र विषय घेऊन मास्टर्स डिग्री शिकत आहे. अथर्व तिथल्या कॉलेज मधील भारतीय विद्यार्थ्यांना समवेत घेऊन गेली दोन वर्षे गणेश मूर्तीची स्थापना करुन मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी उत्सव साजरा करत आहे.यावर्षी पण त्यांनी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यात त्याला त्याचे मित्र गौरव,मानसि यांचे सहकार्य लाभले. अथर्व चा पुण्यातील मित्र गौरव याने सुबक गणेश मुर्ती बनवली होती .गणेश चतुर्थी दिवशी मंत्रोपचार करत गणेशाची प्रतिष्ठापना केली होती.रात्रभर जागून त्यांनी नैवेद्यासाठि आवश्यक मोदक आदि पदार्थ बनवले होते. जर्मनीतीलही मित्र मर्सि,फिनाहि सहभागी झाले होते. पाच दिवसांच्या या गणेशोत्सवात आपले कॉलेज सांभाळून अथर्व आणि मित्रांनी भारतिय संस्कृती जतन करत दिमाखात गणेशोत्सव साजरा केला. आणि परदेशातही भारतीय संस्कृतीचा डंका वाजवला.
आचरा--अर्जुन बापर्डेकर