फोंडाघाट जुगारामधील “या” संशयितांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांकडून अवैध धंद्यावरील कारवाई ला वेग
फोंडाघाट बाजारपेठ या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर कणकवली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित आरोपींकडून 1 लाख 1 हजार 600 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी शामसुंदर मोदी, सिनु देवरा, रोहित पारकर, मारुती रेवडेकर, आनंद चिके, प्रकाश साळवी, संदीप कोथंबिरे, आनंद पावसकर, मनीष गांधी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम वंजारे, चंद्रकांत झोरे, विनोद चव्हाण, चंद्रकांत माने, मनोज गुरव, किरण मेथे, रणजित दबडे, सचिन माने आदींनी ही कारवाई केली. कणकवली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली