हरकुळ बुद्रुक येथील काणेकर दुकान आगीत जाळून खाक

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे काणेकर यांच्या दुकानाला अचानक रविवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील साहित्य आगीत जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली.
काणेकर यांच्या दुकानाला ४.१५ वाजण्याच्यासुमारास आग लागली. ही बाब रिक्षा व्यावासियकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मिळताच सरपंच व ग्रामस्थांनी घटनास्थळी जात आग विझविण्यासाठी मदत कार्य चालू केले. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह घटनास्थळी जात पाहाणी केली. दरम्यान यावेळी आमदार नितेश राणे यांनीदुकान मालक यांना आर्थिक मदत केली.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, मिलिंद मेस्त्री, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, प्रशासकीय कर्मचारी श्री. वारंग यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी