अर्चना घारे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्ते याच्या घरी घेतलें गणरायाचे दर्शन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात घरोघरी भेट देत गणरायाच दर्शन घेतले..
“गणेशोत्सवात घरघरात गणरायाचे उत्साहात स्वागत केले जाते, आपले मित्र आप्तेष्टांच्या घरी जाणे, गणरायाची आरती करणे या माध्यमातून ऋणानुंध अधिक घट्ट होतात.” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद व समृध्दी यावी अशा सदिच्छाही सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केल्या