डॉ दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग आजी आजोबा दिन अभूत पूर्व सोहळा आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा….

मालवण शासनाच्या विविध संस्कार जन्य उपक्रमातील कौतुकास्पद असा आजी आजोबा दिन देवबाग हायस्कूलमध्ये संपन्न झाला त्यावेळी व्यासपीठावर दशावतारी ज्येष्ठ कलावंत श्री जीजी चोडणेकर, संस्थाध्यक्ष श्री भानुदास येरगी , संस्था आधारस्तंभ श्री निलेश सामंत, श्रीमती चोडणेकर आजी, पायाची साळगावकर आजोबा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रचना रुपेश खोबरेकर, आधी उपस्थित होते
यावेळी प्रस्तावना मुख्याध्यापिका खोबरेकर यांनी केली, सूत्रसंचालन श्री विवेक गोसावी यांनी केले, तसेच श्री भानुदास यांनी आजी आजोबांचे महत्त्व याच्यावर भाष्य केले, सन्मानित पाहुणे झी गौरव पुरस्कार विजेते जी जी चोडणे कर यांनी आपल्या बालपणातील काही गमती जमती सांगत आपल्या आजीची आठवण काढली, यावेळी आजोबा प्रतिनिधी म्हणून श्री देवेंद्र कांदळगावकर यांनी आजची पिढी आजी आजोबांना विसरत चालली आहे त्यावर मुलांना बोध केला. इतर सहकार्य श्री मेस्त्री सर. श्री बांगरे सर, श्री उदय चोडणे कर. कैलास कडू यांनी केले प्रशालेच्या वतीने प्रत्येक आजी आजोबांना सुपारीचे झाड देऊन गौरव करण्यात आला बांगारे सर, घेवडे सर यांनी या त मुलाचा वाटा उचलला. विद्यार्थ्यांचे उत्तम सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी महापुरुष बिट्स या नावाजलेल्या देवबाग मधील बँजो ग्रुप ने मोफत सहकार्य केले
गजाजन मांजरेकर । मालवण