समुद्रात बुडालेल्या साकेडीतील त्या तरुणाचा मृतदेह मिळाला

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी – मुस्लिमवाडी येथील तरुण सुफयान दिलदार शेख (23) या तरुणाचा मृतदेह बुडाल्याच्या ठिकाणापासून काहीच अंतरावर आज सकाळी आढळून आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यावेळी पोलीस कर्मचारी शिवा शिवगण यांच्यासह अधिकारी व अन्य उपस्थित होते. सुफयान हा आपल्या वाडीतील व अन्य मित्रा सोबत तारकर्ली येथे गेला होता. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडल्याची माहिती त्याच्या सोबत अन्य तरुणांनी दिली. दुसऱ्या एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!