” सारथी ” पुणे तर्फे आयोजित निबंध स्पर्धेत आयडियल प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे यश.

कणकवली/मयुर ठाकूर.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) पुणे आयोजित राजश्री शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२३ या स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
या स्पर्धेत ८ वी ते १० वी या गटातून तालुक्यातील १०० हून अधिक निबंध होते,यातून प्रशालेच्या कू .मयुरेश श्याम सोनूर्लेकर या १० वी तील विद्यार्थ्याने ६ वा क्रमांक तर कू.सर्वेश सचिन शिरसाट( १० वी) याने ९ वा क्रमांक प्राप्त केला
दोघांच्याही निबंधाची पुणे येथे पुढील स्तरासाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.