पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे जगात भारताची मान उंचावली – निलेश राणे

कुडाळमध्ये मोदी यांच्या जीवनपट छायाचित्राचे प्रदर्शन

निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

निलेश जोशी । कुडाळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे कणखर आणि धाडसी असल्यामुळे जगात आता भारताची मान उंचावली आहे असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी आणलेल्या योजना ह्या जनसामान्यांसाठी फलदायी ठरत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुडाळ येथे आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील छायाचित्र प्रदर्शनाच्या शुभारंभावेळी रविवारी ते बोलत होते.
कुडाळ भाजप कार्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते याचा शुभारंभ भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या हस्ते फीत कापून झाले तसेच यावेळी मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलशांमध्ये माती अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, प्रदेश सदस्य सौ संध्या तेरसे, बंड्या सावंत, निमंत्रक राजू राऊळ, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, महिला तालुकाध्यक्ष आरती पाटील, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, माजी सभापती मोहन सावंत, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, रुपेश कानडे, पप्प्या तवटे, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, निलेश तेंडुलकर, राजेश पडते, भाऊ पोतकर, भूपेश चेंदवणकर, अनिल कुडपकर आदी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी भाजपा नेते निलेश राणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना जो विकास केला तो कोणीही विसरू शकत नाही आणि त्यांचा हा जीवनपट छायाचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात आला आहे. देशाला खरे कणखर आणि धाडसी नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मिळाले आहे त्यांनी विविध योजना जनसामान्यांसाठी आणले आहेत आणि त्याचा लाभ जनतेला होत आहे. देशामध्ये २०१४ नंतर जो बदल झाला आहे तो जनता अनुभवत आहे. असे त्यांनी सांगितले.

लोकांना पुन्हा राणे हवे

या भागामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीत विकास झाला आहे जे प्रकल्प आणले गेले त्यानंतर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार, आमदारांनी एकही प्रकल्प सुरू केला नाही किंवा नव्याने प्रकल्प आणला नाही या भागाला उजाड करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आता जनतेला समजून चुकले आहे की, या भागाचा विकास हवा असेल तर राणे यांची गरज आहे हे जनतेला समजून चुकले आहे. असे भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले.

खासदारकीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये कोणीही किती दावे केले तरी तीन पक्षांचे सरकार आहे आणि त्या तीन पक्षांमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य करावा लागेल त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण उमेदवार असणार याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होणार असल्याचे भाजपाने नेते निलेश राणे यांनी सांगितले.

आनंद पाहून झाले समाधान

गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी यापूर्वी आम्ही बसेस सोडत होतो मात्र आता गणेश भक्तांसाठी रेल्वेची व्यवस्था आम्ही करून दिली. रेल्वेमधून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले की, सर्वसामान्यांसाठी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेली रेल्वे सेवा किती महत्त्वाची आहे असे भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग राजा यावर्षी १७ दिवस

भाजपा कार्यालय येथे दरवर्षी सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. हा गणेशोत्सव दरवर्षी अनंत चतुर्दशी पर्यंत असतो पण यावर्षी गणेश उत्सव १७ दिवस करण्याचा आमचा मानस आहे. या निमित्ताने गणेश भक्तांना गणेशाचे दर्शन होईल तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजपयोगी उपक्रम राबवले जातील असे भाजपा नेते निलेश राणे यांनी सांगितले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!