मसुरे सुपुत्र श्री नंदू ( दादा ) परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती…

डोंबिवली आणि मसुरे गावामध्ये अभिनंदनचा वर्षाव..

मसुरे येथील रहिवासी आणि डोंबिवली येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री नंदकुमार उर्फ नंदुदादा घनश्याम परब यांची कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे. नंदू परब हे डोंबिवली येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून या परिसरात त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक अभिनव उपक्रम ते पक्षाच्या माध्यमातून डोंबिवली भागामध्ये नेहमी राबवत असतात. डोंबिवली येथील विविध विकासात्मक प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सोडविलेले आहेत. अपूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाची विविध पदे यशस्वीरित्या भूषविली असून त्या सर्व पदांना त्यांनी योग्य तो न्याय दिला होता.
मसूरे येथील विकास कामांमध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नंदू दादा परब यांच्या निवडीबद्दल मसुरे परिसरा सहित डोंबिवली मधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे…

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!