भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा!

मसुरे – भरतगड इंग्लिश मीडियम स्कुल मसुरे या प्रशालेमध्ये हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय परिपाठ हिंदी भाषे मधून सादर करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये सहभागी होत उत्कृष्टपणे सादरीकरण केले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी हिंदी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले.यावेळी शिक्षिका पार्वती कोदे, संजना प्रभुगावकर,सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर ,समीर गोसावी ,स्वरांजली ठाकूर,रसिका मेस्त्री, सविता मेस्त्री ,रेश्मा बोरकर उपस्थित होते.

error: Content is protected !!