राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या माध्यमातून कुणकेश्वर, धोपेश्वर दर्शन

कणकवली शहरातील महिलांना दिला लाभ

राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज श्रावण सोमावर निमित्त कणकवलीतील शिवाजीनगर, जळकेवाड़ी व इतर भागातील महिला भगिनीना दरवर्षी प्रमाणे कोकणची काशी श्री देव कुणकेश्वर व राजापुर येथील श्री देव धोपेश्वर या देव दर्शनासाठी व्यवस्था केली. अबिद नाईक हे गेली अनेक वर्ष कणकवलीतील महिला भगिनिना श्रावण महिन्यात श्रावण सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर येथे देवदर्शन करण्याची व्यवस्था करत असतात. त्याच प्रमाणे ह्या वर्षी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी देवदर्शनाची महिला भगिनीनची व्यवस्था केली त्याबद्दल सर्व महिला भगिनीनी अबिद नाईक यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर दरवर्षी या देवदर्शनाचे सातत्य राहिल असे अबिद नाईक यांनी आपल्या सर्व महिला भगिनी यांना आश्वाशीत केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!