भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी संदीप मेस्त्री

संदीप मेस्त्री यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी कलमठ ग्रामपंचायतचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संदीप मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे. संदीप मेस्त्री हे युवा चळवळीतील एक प्रमुख नाव म्हणून गेले काही वर्षात समोर आले आहे. भाजपाच्या माध्यमातून राजकारण व समाजकारण करत असताना त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवत जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सरपंच पदाची धुरा स्वीकारल्यानंतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कामातून एक वेगळा ठसा उमटवला. युवकांची मोठी फळी संदीप मेस्त्री यांच्याबरोबर असून भाजपा पक्ष नेतृत्वाकडून त्यांना या पदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली




