वैभववाडी युवासेना तालुकाप्रमुख पदी रोहित पावसकर

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी दिले नियुक्ती पत्र
कणकवली मतदारसंघात युवा सेनेला नव्याने बळ
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वैभववाडी युवा सेना तालुका प्रमुख पदी रोहित पावसकर, युवा सेना विभाग संघटक पदी संदेश सुतार ,
युवा सेना विभाग प्रमुख पदी मयूर दळवी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





