भालचंद्र महाराज संस्थान संचालक मंडळ विरोधात उपोषण

11 सप्टेंबर रोजी संस्थान मंदिरा नजीक उपोषण जाहीर

परमहंस भालचंद्र महाराज संस्थांच्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात कणकवलीतील भक्तगण उपोषण करणार आहेत. अशी माहिती कणकवली मधील उमेश वाळके, प्रवीण उर्फ भैय्या आळवे, अण्णा कोदे, सुनील पारकर, नंदू वाळके व माया अंधारी यांनी दिली. ते म्हणाले, सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भालचंद्र महाराज संस्थान नजीक उपोषणास बसण्यात येणार आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भालचंद्र महाराज संस्थांच्या कार्यकारणी मंडळाच्या मनमानी विरोधात काही पडलेले प्रश्न याची उत्तरे सामान्य भाविकाना मिळण्याची गरज आहे. आपल्या मर्जीतले सदस्य करण्यामागचा संचालक मंडळाचा नेमका उद्देश काय? तसेच शंभर रुपयाची सभासद फी दहा हजार रुपये करणे या मागचा हेतू काय? आपल्या संचालकांना चार चार सभासद फॉर्म वाटण्यात आले. बाबाचा सभासद होण्याची सामान्य माणसाचा अपेक्षाभंग करण्यात आला. तसेच सर्व जातीतील संचालकांना त्याच त्या जातीचा सभासद करण्यामागचा व बाबांच्या मंदिरात जातीयता निर्माण करण्याचा हेतू काय?
ज्या जातीचा संचालक त्याने त्यांच्या जातीचे सभासद करायचा या मागचा हेतू काय? असा सवाल करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या हट्टीपणाच्या कारभाराला जबाबदार कोण? याचे उत्तर पण तमाम बाबांच्या भक्त जणांना मिळेल काय?
बाबांनी कधीही मंदिरात जातीयता निर्माण केली नाही. पण आज काही संचालक मंडळी या जातीयतेला खत पाणी घालत आहेत. तसेच बाबाचा सभासद होण्याची सर्वसामान्यांची इच्छा भंग पावत आली आहे असं मत सर्वसामान्य भाविकाला पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आमचा विरोध हा बाबांना नसून कार्यकारी मंडळाला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात हे उपोषण असल्याचे म्हटले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!