गणेशोत्सव काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दर निर्धारीत करावेत

मनसेची आरटीओकडे मागणी
प्रतिनिधी । कुडाळ : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने या काळात असंख्य कोकणी माणूस हा मुंबई, पुणे इतरही विविध भागातून गणपती निमित्त आपल्या मूळ गावी मिळेल त्या वाहनामार्फत येत असतो. अशाप्रकारे हा कोकणी माणूस खाजगी ट्रॅव्हल्स मार्फत आपल्या गावी येत असताना सदर खाजगी ट्रॅव्हल्स कंपनी किंवा मालक शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कितीतरी पट अधिक भाडे आकारतात यावर नियंत्रण असावे व सामान्य नागरिकांची होणारे लूट थांबावी याकरिता परिवहन विभागा कडुनच खाजगी ट्रॅव्हल्स चे दरपत्रक निर्धारीत करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केयी आहे. परब आणि किनळेकर यांनी परिवहनचे मुख्य अधिकारी सिंधुदुर्ग श्री काळे यांची भेट घेऊन हि मागणी केली.
अवाजवी दर आकारणी बाबत प्रवाशांच्या तक्रारी अथवा सूचनांसाठी सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मदत कक्ष स्थापन करून हेल्पलाइन-व्हाट्सअप क्रमांक प्रसारित करावा अशा प्रकारची चर्चा व मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. चर्चेअंती परिवहन अधिकारी श्री काळे यांनी मनसेच्या सूचनेची योग्य ती दखल घेऊन येत्या चार / पाच दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.