समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून विकासकामांना प्राधान्य देणार – छगन भुजबळ

नाशिक – समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व कामांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
निफाड तालुक्यातील दहेगाव, वाहेगाव व भरवस येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
या विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, उपअभियंता रवींद्र पुरी, शाखा अभियंता तनुष चव्हाण, आर. फारुकी, सरपंच शरद भडांगे, सचिन दरेकर, मीना माळी, उपसरपंच चेतन आहेर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र भवर, माजी सरपंच बन्सी जाधव, चेअरमन सुकदेव डूमरे, व्हाईस चेअरमन त्र्यंबक काळे, प्रदीप तीपायले, संपत डूमरे, शरद भडांगे, मोहसीन शेख, दिपक डूमरे, विलास गोऱ्हे, माधव जगताप, शरद भडांगे, विक्रम दराडे, रामकृष्ण दराडे, रामभाऊ जगताप, महेश पाटील यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांना आवश्यक असलेल्या मुलभूत सेवा-सुविधा आणि लोकोपयोगी कामांना प्राधान्य देवून त्यानुसार विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु आज जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे आशेचा किरण दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पहिल्या हफ्त्याचे वाटप करण्यात आले असून लवकरच दुसराही हप्ता लवकर वितरित केला जाईल. येणाऱ्या काळातही विकासाची कामे सुरू राहतील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
आरक्षणाच्या विषयावर लोकांची माथी भडकविण्याची काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आपलीसुद्धा मागणी आहे. मात्र कुणीही राजकारण करू नये असेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
या कामांचे झाले लोकार्पण
निफाड तालुक्यातील दहेगांव येथे मुलभूत सुविधा योजनेंतर्गत सभा मंडपाचे लोकार्पण
निफाड तालुक्यातील वाहेगाव जिल्हा नियोजन मधुन सिंगल फेज ट्रान्सफार्मर बसविणे कामाचे लोकार्पण
निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे स्थानिक विकास निधीमधुन पिक-अप शेडचे लोकार्पण…