गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामपंचायतीकडून आरोग्य तपासणी

सावंतवाडी
गणेशोत्सव काळात आरोग्याची काळजी म्हणून मळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांनी खास आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.
जिल्ह्यासह सावंतवाडी तालुक्यात सद्या ताप सर्दी खोकला असे साथरोग पसरले आहे.याच पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॅाक्टर व कर्मचाऱ्यांकडून तब्बल पन्नास ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करत औषध उपचार करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधा सोबतच बाहेरील औषधे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आली.
यावेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी श्रीम.सुप्रिया धाकोरकर,प्रियांका कासार,आरोग्य सेविका एस.डी.नाईक, आरोग्य सेवक एस.एस.कुबल,ग्रामपंचायत सदस्य,मळगाव ग्रामविकास अधिकारी एम.एम.बांदेकर,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.शिबिर आयोजित करुन आरोग्याची खबरदारी घेतल्याने मळगाव गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.