कणकवली महाविद्यालयात सोमवारी नोकर भरतीच्या मुलाखती

कणकवली/मयुर ठाकूर
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नोकर भरती कक्ष आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता एचपीसीएल सभागृहात नोकरभरती मुलाखतीचे आयोजन केले आहे.
वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार या मुलाखतीसाठी पात्र असतील. मुलाखतीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या एसबीआय लाइफ इन्शुरन्स शाखेत डेव्हलपमेंट मॅनेजर व ग्रॅज्युवेट ट्रेनी या पदावर हुशार, होतकरू व कार्यक्षम उमेदवारांना आकर्षक पगारावर नेमणुका दिल्या जाणार आहेत.
तरी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्र व पासपोर्ट छायाचित्र सोबत घेवून कणकवली महाविद्यालयात वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे व नोकर भरती कक्षाचे प्रमुख प्रा.सुरेश पाटील यांनी केले आहे.