वागदेत अपघातात दुचाकीस्वार गंभीर

उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

कणकवलीहुन ओरोस च्या दिशेने जात असताना महामार्गाच्या डिव्हायडरला आदळून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला., डिव्हायडरला आदळल्याने दुचाकी डिव्हायडरवर पडून या दुचाकी स्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळतात वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांच्या सह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!