डॉ. सायली महेश कामत यांचे एमडीएस परीक्षेत यश

दंतवैद्यकीय विषयात मिळवले विशेष प्राविण्य

दंत वैद्यकीय क्षेत्रातील एमडीएस परीक्षेमध्ये कणकवली मधील डॉ. सायली महेश कामत हीने विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केले.डॉ. सायली कामत यांनी बीडीएस ही पदवी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय मध्ये मिळवली. व त्यानंतर तिने उच्च शिक्षण संगमनेर येथील कॉलेज एस एन बी टी मधून पूर्ण केले. दंत वैद्यकीय क्षेत्रात एन्डोडॉनटीस या विषयातील तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. रूट कॅनल स्पेशालिस्ट म्हणूनही तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. डॉ. सायली ही कणकवलीतील प्रतीथयश व्यापारी महेश कामत व सौ रूपाली कामत यांची मुलगी तर रमेश कामत, सुरेश कामत व कै. अपिशेठ गावाणकर यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!