डॉ. दीपाली काजरेकर यांच्या ‘चंद्रदीप’ चे दिमाखात प्रकाशन

कोमसाप कुडाळ यांच्या वतीने प्रकाशन सोहळा
प्रतिनिधी । कुडाळ : जीवनाबद्दलचा सकारात्मक भावनाशील दृष्टीकोन आणि सत्यम् – शिवम् सुंदरचा आंतरिक ध्यास’यातून डॉ दिपाली काजरेकर यांची चंद्रदीप कविता आविष्कृत झालेली आहे. असे प्रतिपादन शुभेच्छा पत्रातून ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले चंद्रदीप कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सोमवारी दिमाखात पार पडला
कोंकण मराठी साहित्य परिषद सिंधुदूर्ग शाखा कुडाळच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका डॉ सौ दिपाली काजरेकर यांच्या चंद्रदीप कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात साहित्यिकप्रेमी हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या चंद्रदीप कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले यावेळी ज्येष्ठ साहित्यिका सौ वृंदा कांबळी, अँड सुहास सावंत, कोमसापचे पदाधिकारी आनंद वैद्य, मंगेश मसके, सौ उषा परब, लेखिका डॉ सौ दिपाली काजरेकर, श्री चंद्रकांत काजरेकर, कॉलेजचे प्राचार्य डॉ व्ही बी झोडगे, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, धीरज परब, नगरसेवक मंदार शिरसाट, सुरेश पवार, अतुल बंगे, बंड्या सावंत, सौ प्रतिभा पाटणकर, भरत गावडे, प्रा अरुण मर्गज, डाॅ. सई राणे, अँड प्रकाश परब, अजित शिरोडक,र अनुष्का रेवणकर, प्रसाद खानोलकर, प्रदीप केळुसकर, किरण पिंगुळकर, डॉ आवटे, विठ्ठल कदम, स्वाती सावंत, रवीकिरण जाधव, राजेंद्र गोसावी, प्रगती पाताडे, सुस्मिता राणे, गोविंद पवार, संतोष वालावलकर, जिल्ह्यातील साहित्यिक हितचिंतक विठ्ठलवाडीतील नागरिक आदी उपस्थित होते.
शुभेच्छापत्रात पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटले आहे की कोकणातील नवोदित कवयित्री डॉ. दिपाली काजरेकर या आपला पहिलाच काव्यसंग्रह’चंद्रदीप’ वाचकांना सादर करीत आहेत. त्या स्वत: अनेक पुरस्कारांच्या मानकरी व ख्यातनाम शिक्षिका आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना बालमनाचे अंतरंग जवळून अनुभवता आले आहेत. आणि त्याचबरोबरच भवतालच्या समाजाचे अवलोकन ही त्यांच्या चिंतनशील काव्यात्मक मनाने केलेले आहे. त्याचे अंतरंग ‘चंद्रदीप’ मध्ये उत्कटपणे उमटलेले आढळतात. त्यांच्या कविता मला आवडल्या. पुढील काव्य- प्रवासासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या शुभेच्छापत्राचे वाचन प्रा अरुण मर्गज यांनी केले.
सर्वाच्या सहकार्यातून’ चंद्रदीप’ तुमच्यापर्यंत – डॉ काजरेकर
आजचा क्षण माझ्या जीवनातील आनंदमयतेचा झरा वाहणारा आहे आमच्या घराण्याला साहित्यिकांचा वारसा आहे माझ्या मुली डॉ नालंदा व डॉ नुपूर यांनी शालेय जीवनात साहित्य लेखणीतून अनेक पारितोषिके मिळवित राज्य पातळीपर्यंत झेप घेतली काही कविता मी माझी नात समायरा हिच्या सहवासातून साकारल्या आहेत चंद्रदीप या कविता संग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक प्रा प्रदिप ढवळ यांची प्रस्तावना आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच चंद्रदीप तुमच्यापर्यंत पोचला आहे असे प्रतिपादन लेखिका डॉ दिपाली काजरेकर यांनी केले
सौ कांबळी यांनी उत्कंठ भावनांचा आविष्कार हा चंद्रदीप कवितासंग्रहात दिसून येतो डॉ दिपाली काजरेकर या अनेक पुरस्काराच्या मानकरी आहेत त्यांच्या चंद्रदीपने कवितासंग्रहाने एक वेगळे भावविश्व निर्माण केले आहे असे सांगितले. अँड सुहास सावंत यांनी आजची तरुण पिढी साहित्यापासून दूर होत चालली आहे साहित्य हे आपल्याला जगायला शिकविते साहित्याचे महत्व ओळखून ही पिढी याकडे वळली पाहिजे असे सांगितले श्री वैद्य यांनी दुसऱ्याला जगविण्याची कृती या कवितासंग्रहात दिसते. श्री झोडगे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम लेखक कवी यांनी केले आहे. स्वातत्र्यसंग्रामात लेखक व कवी यांचे फार मोठे योगदान आहे. डॉ काजरेकर यांनी यापुढे अनेक कविता संग्रह करीत काव्य विश्व समृध्द करावे असे सांगितले. मंगेश मसके, धीरज परब, किरण पिंगुळकर, यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन प्रा अरुण मर्गज यांनी केले आभार प्रा संतोष वालावलकर यांनी मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.