वृद्ध कलाकार मानधन निवड समिती,सिंधुदुर्ग येथे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. हरिभाऊ भिसे यांचा कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली यांच्या वतीने होणार सत्कार.

शनिवार दिनांक 2 सप्टेंबर सायंकाळी चार वाजता परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे कला क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे संस्थेकडून आवाहन.
कणकवली/मयुर ठाकूर
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था यांस कडून वृद्ध कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग येथे सदस्य पदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांचा सत्कार केला जाणार आहे.हा सत्कार परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. कणकवली तालुका भजनी सांप्रदायिक संस्था यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काही महिन्यांपूर्वी विनंती पत्र दिले होते.त्यामध्ये कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे कोणतेही दोन सदस्य “वृद्ध कलाकार मानधन समिती” मध्ये घेण्यासाठी आग्रह केला होता.तालुका संस्थेने केलेल्या या विनंती पत्रास मान देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुका भजन सांप्रदायिक संस्थेचे जेष्ठ सदस्य संतोष कानडे बुवा यांना थेट अध्यक्षपदी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडण्यात आले.संस्थेच्या विनंती पत्रास मान देऊन ही निवड केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार देखील संस्थेकडून व्यक्त केले जात आहेत.संस्थेचे पदाधिकारी असलेले संतोष कानडे बुवा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर कणकवलीतील जेष्ठ कलाकार प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर यांची देखील या समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हरिभाऊ भिसे यांचा देखील कणकवली तालुका भजन सांप्रदायिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.तरी या सोहळ्यास आपण सर्वांनी अर्थातच कला,सांस्कृतिक,धार्मिक अशा विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था यांस कडून करण्यात येत आहे.