जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती सदस्य पदी प्रा. हरिभाऊ भिसे

कणकवली/मयुर ठाकूर
येथील शिक्षण प्रसारहरिभाऊक मंडळाच्या व्यवसायिक शिक्षण विभागातील प्रा. हरिभाऊ भिसे यांची सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन निवड सल्लागार समितीवर सदस्य पदी निवड झाली आहे.
प्रा. हरिभाऊ भिसे यांची या समितीवर सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून याबद्दल कणकवली महाविद्यालयात नुकताच प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजु ,सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. हरिभाऊ भिसे यांचे अभिनंदन केले आहे.