“त्या” युवतीच्या पोस्ट बाबत दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू!

युवती कडे कणकवली पोलिसांकडून चौकशी
पोलीस निरीक्षक अमित यादव यांची माहिती
पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा तसेच हिंदू देवतांबद्दल बदनामीकारक पोस्ट इंस्टाग्राम वर व्हायरल केल्यानंतर कणकवली तालुक्यातील एका गावातील एका मुस्लिम धर्मिया युवती च्या विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहेत. ‘त्या’ युवतीची कालपासून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज गुरुवारी जिल्हा दहशतवादी विरोधी पथक कणकवली दाखल झाले. व त्या युवतीला ही पोस्ट करायला लावण्यामागे कुणाचा हात आहे? तिच्याशी अन्य कुणी संपर्कात आहे का? देश विरोधी पोस्ट करण्याविषयी तिला कोणी प्रोत्साहित केले होते का? त्या युवतीने ही पोस्ट अज्ञानातून केली की तिच्यामागे कोणी रॅकेट आहे? या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यानी आज कणकवलीत भेट देत तपास सुरू केला. तसेच चौकशी अंती “त्या” युवतीवर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. त्या युवतीकडून याबाबत गोपनीय रित्या तपास सुरू असून, तपासातील काही मुद्दे हे उघड करता येणार नसल्याचे श्री यादव यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर /कणकवली