जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटे द्वितीयकनेडी हायस्कूलचे सुयश

कणकवली/मयुर ठाकूर
उत्कर्ष युवक कला, क्रीडा, व्यायाम मंडळ इन्सुली डोबाची शेळ पुरस्कृत आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली तर्फे आयोजित व माजी शिक्षण सभापती श्री. गुरूनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी मैत्रेयी मकरंद आपटे (इ. ९वी) हिने इ. ८वी ते १०वी या गटात उत्कृष्ट वक्तृत्वाचे सादरीकरण करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ‘अंतराळयात्री भारत’ या विषयावर तिने अतिशय ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करून उपस्थित रसिकांची व परीक्षकांची मने जिंकून घेतली. सदर यशाबद्दल तिला रोख रू. २०००/- , सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गुरूवार दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी इन्सुली हायस्कूल इन्सुली येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे संपन्न झाली. यापूर्वी सुद्धा एकपात्री अभिनय, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा अनेक स्पर्धांमध्ये मैत्रेयीने पारितोषिके पटकावली आहेत.
सदर यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मैत्रेयीचे अभिनंदन केले.
मैत्रेयीला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी विषय शिक्षक श्री. मकरंद आपटे आणि प्रशालेतील मराठी विषयाच्या तज्ज्ञ शिक्षिका श्रीम. पल्लवी हाटले यांचे मार्गदर्शन लाभले.