प्रा. सुरेश पाटील व राष्ट्रीय सेवा योजना विभागात जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

कणकवली /मयुर ठाकूर.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षीचा ‘जिल्हास्तरीय बेस्ट युनिट पुरस्कार ‘जाहीर झाला आहे. तसेच महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश पाटील यांना ‘बेस्ट प्रोग्राम ऑफिसर ‘ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराची घोषणा केली जाते. कणकवली महाविद्यालयाला हा मान दुसऱ्यांदा मिळाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आरोग्य, स्वच्छता, जनजागृती, दत्तक गाव वागदे या ठिकाणी जलसंधारण कार्यक्रम घेण्यात येतात.
कणकवली महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कार्यक्रम अधिकारी प्रा .सुरेश पाटील व सर्व सहकारी कार्यक्रमाधिकारी या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे,चेअरमन डॉ.
राजश्री साळुंखे ,सचिव श्री विजयकुमार वळंजू,सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.