स्पर्धात्मक युगात नवी आव्हाने स्वीकारा – शरद नारकर

सिधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी सर्वसाधारण सभा

सभासद पाल्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्तांचा सन्मान सोहळा

प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत.   जिद्द चिकाटी मेहनतीला आत्मविश्वासाची जोड दिली पाहिजे,  असे प्रतिपादन सिधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिधुदुर्ग अध्यक्ष शरद नारकर यांनी सभासद पाल्याचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळ्यात केले.
    सिधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिधुदुर्ग ची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज हॉल कुडाळ येथे सस्था अध्यक्ष शरद नारकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. .यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सिंधुदुर्गच्या कार्यालय अधिक्षक श्रीम. उर्मिला यादव, सस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद कुटे, संचालक महेश गावडे, उदय शिरोडकर, संजय गावडे, आनंद परुळेकर, सुदर म्हापणकर, वसंतराव पाटोळे, राजेश कुडाळकर, दिलीप मसके, विनयश्री पेडणेकर, शितल परूळेकर, विकास घाडीगावकर, मंगेश राऊत, अर्जुन नाईक, नितीन जठार, संजय पाताडे, उदयसिंग रावराणे, सचिव रामचंद्र दळवी, शाखाव्यवस्थापक योगिता परब, कर्मचारी प्रतिक दळवी, शुभम चव्हाण, सभासद, सेवानिवृत्त सभासद, गुणगौरव विदयार्थी उपस्थित होते
श्री नारकर म्हणाले आजची युवा पिढी विद्यार्थी देशाचे भविष्य आहात कोणतेही काम आव्हान म्हणून स्वीकारा असे सांगत सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्व गोष्टी आल्या पाहिजेत असे सागितले. सभासदाच्या मागणीनुसार संचालक मंडळाने यावर्षी ११ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर केलेले आहे. संस्थेने दशकपुर्तीकडे वाटचाल केली असल्यामुळे सदर दशकपुर्ती विविध कार्यक्रमांनी साजरी करणार असल्याचे  श्री नारकर यांनी सांगितले. संस्थेचा ठेवीचा व्याजदर हा जास्तीत जास्त ९.५ टक्के असल्याने सिधुदुर्ग जिल्हयातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यानी तसेच संस्थेचाच सेवानिवृत्त सभासदानी सस्थेचे जास्तीत जास्त सभासद होऊन ठेवीत गुतवणुक करावी तसेच पगार तारणावरती सुलभ प्रक्रियेने कर्ज उचल करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय सिंधुदुर्गच्या कार्यालय अधिक्षक श्रीम. उर्मिला यादव  यांनीही संस्था वाढीच्या दृष्टीने व कामकाजासंबधी बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी सन २०२२-२३ सालात उत्तीर्ण झालेल्या सभासद पाल्याचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा पार पाडला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!