“उत्तर सेल”ची “कणकवली स्टाईल” उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला दणक्यात

उद्घाटन होण्यापूर्वीच ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
आज उद्घाटन, 10 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार हा महासेल!
कोल्हापूर मधील गांधीनगर येथील व्यापाऱ्याने कणकवलीत लावलेल्या सेल ला उत्तर देण्यासाठी कणकवली येथील कणकवलीतील स्थानिक कापड व्यापाऱ्यांनी जुन्या एलआयसी ऑफिस मध्ये लावलेल्या “उत्तर सेल” ची “कणकवली स्टाईल” ग्राहकांच्या झुंबडीमुळे पसंतीस उतरल्याचे शिक्कामोर्तब झाले. या महासेलचे उद्घाटन करण्याच्या पूर्वसंध्येलाच बुधवारी महासेलला दणक्यात प्रतिसाद मिळाला. 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हा महासेल सुरू राहणार आहे. कोल्हापूरच्या व्यापाऱ्याने कणकवलीत सेल लावल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी त्याच स्टाईलने उत्तर देत “कणकवली स्टाईल” सत्यात देखील उतरवली आज गुरुवारी सकाळी या सेलचे जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना सेलच्या पूर्वसंध्येला काल अक्षरशा ग्राहक खरेदी करिता तुटून पडले होते. कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांनी लावलेल्या या महासेलमध्ये “सेलचा माल मस्त, अगदी स्वस्ताहून स्वस्त” या टॅग लाईन खाली अत्यंत माफक दरामध्ये असंख्य व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. “बाई पण भारी देवा”, फेम साडी 180 व 500 रुपयांमध्ये, साड्यांच्या १३० रुपयापासून 800 रुपये पर्यंत व्हरायटी या महा सेलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे या करिता महिला वर्गाची तर अक्षरशा धमाल झाली आहे. तसेच साड्या, गाऊन, परकर, टॉवेल, ब्लॅंकेट, बेडशीट व अन्य अनेक वस्तू या महासेल मध्ये ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स सह खरेदी करता येणार आहेत. यामध्ये सिंगल ब्लॅंकेट 900 रुपयाला 4 नग, डबल ब्लॅंकेट 900 रुपयाला 3 नग, सिंगल बेडशीट 250 रुपयाला 2 नग, डबल बेडशीट उशी कव्हर सहित 500 रुपयाला दोन नग, उशी कव्हर पन्नास रुपयाला 3 नग, पायपुसणी 90 रुपयाला 3 नग, विमल परकर 100 रुपयाला 1 नग, कॉटन गाऊन 400 रुपयाला 3 नग, मंगळसूत्र साडी 450 रुपयाला 2 नग, फुल साईज उशी 90 रुपयाला 1 नग, सियाराम पॅन्ट शर्ट सेट 600 रुपयाला दोन नग, सोलापुरी चादर 400 रुपयाला दोन नग, टॉवेल 90 रुपयाला 3 नग, यासह अन्य अनेक नाविन्यपूर्ण वस्तू व व्हरायटींचा महासेल उद्घाटनाच्या पूर्वीच ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. कोल्हापूर येथील व्यापाऱ्याच्या पेक्षा कमी दराने वस्तू ग्राहकांना देत तोडीस तोड हा महासेल सुरू करत कणकवलीतील कापड व्यापाऱ्यांनी ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर ग्राहकांना डबल धमाका दिला आहे. कणकवली काल बुधवारी सायंकाळी सेल सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला अक्षरशा या सेल च्या काउंटरला बिलांसाठी रांग लागली होती. या सेलमध्ये कणकवली सह जिल्ह्यातील नागरिकांनी खरेदीसाठी या व या महासेल मधील अनेक धमाकेदार ऑफरचा लाभ घ्या असे आवाहन कणकवली कापड व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली