वृद्ध कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बुवा श्री संतोष कानडे यांचे हार्दिक अभिनंदन.

कणकवली तालू सांप्र.भजनी संस्था यांच्या विनंती पत्रास मान देऊन अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संस्थेकडून पालकमंत्र्यांचे आभार.
कणकवली तालु सांप्र.भजनी संस्था यांस कडून 2 सप्टेंबर रोजी 4 वाजता भव्य सत्कार.
जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे कणकवली तालुका सांप्र भजनी संस्थेचे आवाहन.
कणकवली/मयुर ठाकूर.
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यशील भजनी संस्था आहे.या संस्थेच्या माध्यमातून विधायक उपक्रम नेहमीच राबविले जातात. कणकवली तालुक्यातील वृद्ध भजनी कलाकारांना मानधन वेळेत मिळावे यासाठी कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था यांनी आमच्या संस्थेतील कोणतेही दोन सदस्य वृद्ध कलाकार मानधन समितीवर प्रतिनिधी म्हणून घ्या असे विनंती पत्र विद्यमान पालकमंत्री.रवींद्र चव्हाण आणि कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना दिले होते.या पत्राचा संदर्भ घेत विनंती पत्राचा मान राखत कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे जेष्ठ सदस्य बुवा संतोष कानडे यांना थेट वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री.रवींद्र चव्हाण यांनी निवड केली.तसेच या निवडीसाठी आमदार नितेश राणे यांनी मेहनत घेतली. त्यासाठी कणकवली तालुका सांप्रदायिक भजन संस्थेच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच विद्यमान वृद्ध कलाकार मानधन समिती योजनेचे अध्यक्ष बुवा श्री संतोष कानडे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच कणकवली तालुका भजनी सांप्रदायिक संस्थेच्या वतीने येत्या शनिवार दिनांक दोन सप्टेंबर 2023 रोजी श्री संतोष कानडे बुवा यांचा संस्थेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.हा सत्कार सोहळा परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली येथे ठीक चार वाजता करण्यात येणार आहे.तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी बुवा, सर्व पखवाज वादक,भजन रसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका भजनी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.