पांग्रड हायस्कूल उत्तुंग यशाची गुरूकिल्ली

यावर्षीही दहावीचा निकाल 100% मुलींनी मारली बाजी डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात बागडणार आणि नेहमीच चमकते तारे घडवणाऱ्या पांग्रड हायस्कूलचा निकाल या वर्षी देखील 100% टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश प्राप्त केले आहे. प्रथम क्रमांक समीक्षा मर्गज 93.80%…

Read Moreपांग्रड हायस्कूल उत्तुंग यशाची गुरूकिल्ली

विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशा साठीचे दाखले वेळेत द्या !

कुडाळ मनसेची तहसीलदारांकडे मागणी सेतु सुविधा सुलभ होण्याकरिता कुडाळ मनसे आग्रही प्रतिनिधी | कुडाळ : दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी लागणारे विविध दाखले विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कुडाळ तालुका मनसे…

Read Moreविद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशा साठीचे दाखले वेळेत द्या !

फ्लाय९१ची पुणे आणि जळगावसाठी सेवा सुरु

गोवा-जळगाव आणि पुणे-जळगाव दरम्यान सेवा प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : गोवा स्थित फ्लाय९१ या विमान कंपनीने आपले देशांतर्गत नेटवर्क वाढवण्यासाठी जळगाव आणि पुणे दरम्यान उड्डाणे जोडण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पुणे आता फ्लाय९१ चे सातवे देशांतर्गत गंतव्यस्थान बनले आहे.असे फ्लाय…

Read Moreफ्लाय९१ची पुणे आणि जळगावसाठी सेवा सुरु

कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार.

२६ जून रोजी मतदान: जिल्हात २५ मतदान केंद्र.

जिल्हाधिकारी किशोर तावडे
ओरोस(प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी २०२४ रोजी  १७४८४ पदवीधर मतदार नोंदणी झालेली मतदार यादी  प्रसिद्ध झाली आहे. तर ६५७ पदवीधर मतदारांचे अर्ज  ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत.  अजूनही पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करण्याची संधी असून  पात्र असलेल्या पदवीधारकांनी दिनांक  २८ मे २०२४ पर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन नमुना १८ भरून मतदार नोंदणी करू शकतात. जिल्ह्यात २१ मतदान केंद्र असून वाढलेल्या मतदारांमुळे आणखी चार केंद्रे वाढवून  एकूण पंचवीस मतदान केंद्राच्या मंजुरीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  बालाजी शेवाळे उपस्थित होते.
   महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील आमदार  निरंजन डावखरे  यांची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपणार आहे. या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ७ जून  पर्यंत नामनिर्देशन पत्र   सादर करण्याचा अखेरचा दिनांक आहे.  १० जून छाननी, १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक, २६ जून  सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान, १ जुलै रोजी मतमोजणी व ५ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक असा हा निवडणूक कार्यक्रम आहे.
        मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एक जानेवारी 2024 ला अंतिम करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत 17,484  पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. 1  जानेवारी 2024 नंतर ऑफलाइन 106  ११ व १२ मे रोजी घेतलेल्या कॅम्प मध्ये 155  व ऑनलाइन 396  असे एकूण 657 नवीन अर्ज दाखल झाले आहे. 28 मे पर्यंत  रात्री बारा वाजेपर्यंत  पात्र पदवीधर  मतदारांना  ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच ऑफलाइन नोंदणी करता येईल  असेही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.
              पूर्वीची 21 मतदान केंद्र असून  कणकवली कुडाळ वेंगुर्ला या ठिकाणी मतदारांची संख्या वाढल्यामुळे  तहसीलदार कार्यालयात असलेल्या या मतदान केंद्रांना सहाय्यक मतदान केंद्र दिले जाणार आहे  त्यामुळे आणखी चार मतदान केंद्रात वाढ होईल व ती एकूण 25 केली जातील व तसा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे ही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.

Read Moreकोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार.

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजनविचारच माणसाला मोठे करू शकतात : प्रणय शेट्ये तळेरे, (प्रतिनिधी)आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच…

Read More

कुडाळात कापड दुकानाच्या गोडावूनला आग

वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला धोका टळला पण लाखो रुपयांचे नुकसान प्रतिनिधी । कुडाळ : शहरातील ओटवणेकर तिठा येथील वामन शंकर पाटणकर यांचे कापड दुकान असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आज शुक्रवारी सायंकाळी पाच सव्वापाचच्या सुमारास आग लागली. अचानक इमारतीच्या…

Read Moreकुडाळात कापड दुकानाच्या गोडावूनला आग

पिंगुळीतील युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील निलेश मंगेश मोर्ये (वय 42) या युवकाने गुरुवारी सायकाळी गळफास लावून आत्महत्या केलीनिलेश मोर्ये हा काल सायंकाळी घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या खोडदेश्वर या ठिकाणी आपली मोटर सायकल घेऊन गेला…

Read Moreपिंगुळीतील युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

सीएनजी किटमध्ये मिळणार १५ हजाराची सवलत

एमएनजीएलकडून विशेष ऑफर प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील सीएनजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून, तीन चाकी आणि छोट्या वाहनांमध्ये सीएनजी कीट बसवण्यासाठी एकूण खर्चापैकी तब्बल १५ हजारांची सवलत देण्यात येणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएनजीएलच्या वतीने करण्यात आले…

Read Moreसीएनजी किटमध्ये मिळणार १५ हजाराची सवलत

घरावर झाडे कोसळून कविलकाटे येथील रमेश जळवी यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वादळी वारा-पावसाचा कुडाळ तालुक्याला जोरदार फटका प्रतिनिधी | कुडाळ : गुरुवारी रात्री सोसाट्याचे वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पडझड झाली. बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल, विजवाहिन्या, झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत. त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील…

Read Moreघरावर झाडे कोसळून कविलकाटे येथील रमेश जळवी यांचे लाखो रुपयांचे नुकसान

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या  दोन  विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड”  कंपनीमध्ये निवड जयसिंगपूर:(प्रतिनिधी)  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील  इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ …

Read More

*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*
देवगड/चाफेड (प्रतिनिधी)
           देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले.
          या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.
          साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Read More*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*

*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*
                विजय चौकेकर
कणकवली( वार्ताहर .)
       तथागत गौतम बुद्धांना मानवजातीला  बुद्धीवादी बनवायचे होते . माणूस बुद्धीवादी म्हणजेच विज्ञानवादी बनल्यास तो स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यास सिद्ध होईल . आणि  समाजात ज्या भ्रामक समजूती आहेत त्याचे उगमस्थानच नष्ट करेल . म्हणूनच बुद्धाचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवाद जीवनात आचरला तरच माणूस सुखी होईल . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा पियाळी यांनी पियाळी बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या *अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा* आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
     यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम , पियाळी बौद्ध विकास मंडळाचे सचिव तेजराम कदम , प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा मनाली कदम , सचिव चिंती कदम , ग्रामिण पियाळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख गौतम तांबे ‘ सचिव अंकुश कदम , सुधांश तांबे , राहुल कदम आदी उपस्थित होते .

     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले .
पियाळी बौद्ध विकास मंडळ गावशाखेचे  अध्यक्ष गौतम तोबे सर यांनी  विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले तर आता सेवानिवृत्तीचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि गावोगावी जाऊन  अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी आणि समाज घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरवित  असल्याचे सांगून  त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तांबे  सरांनी केले तर आभार  तेजराज कदम यांनी मानले
.

Read More*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*

error: Content is protected !!