बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे नेरूर येथे एनएसएस शिबिर संपन्न

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नेरुर येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्याने, विद्यार्थ्यांचे…

साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे प्रभात फेरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी साने गुरुजी यांच्या126व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या परिसरातून झाली. त्यानंतर MIDC परिसरातून मार्गक्रमण करत…

संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी संपन्न

संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. परिषदेचे मुख्य…

पिंगुळीतील अपघातात बाईकस्वार जखमी

मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे…

वारकरी परंपरेचा जागर! ओरोस येथ मेळावा संपन्न

विजय सिंग तावडे यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार वारकरी संप्रदायाचे कार्य समाजास घडविणारे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,गेली ४५ वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना प्रदान करण्यात आला. ओरोस येथील रवळनाथ मंदिर…

प्रभावती कासले यांचे निधन

वरवडे – बौद्धवाडी येथील प्रभावती राजाराम कासले (वय ७०) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वरवडे येथीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.‌ अनिल कासले, सुनील कासले, संदीप कासले, वनिता…

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीला चॅम्पियनशिप

कणकवली येथे जिल्हास्तरीय स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी आणि प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलचे संस्थापक अध्यक्ष संदिप रघुनाथ चौकेकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२५ येथील नगरवाचनालय सभागृहात झाली. यामध्ये…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ठरला संस्मरणीय

विद्यार्थी-प्राध्यापकांनी जागविल्या जुन्या आठवणी सन २००० बॅचचा रौप्य महोत्सवी सोहळा कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आयडियल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

हुमरमळा(वालावल) तील जलजीवनची कामे पैशांअभावी अपूर्ण

ठेकेदारांचे पैसे न मिळाल्यास जि प सीईओ दालनात ठिय्या ठाकरे सेनेच्या अतुल बंगे यांचा इशारा हुमरमळा-वालावल गावातील जलजीवन योजनेंतर्गत काही कामे अपुर्ण राहीलेली आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाहीत तर…

‘कोकण कला’च्या स्पर्धेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश

कोकण कला आणि शिक्षण केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने चित्रकला, पोस्टर बनविणे, वक्तृत्व, निबंध, वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व कलाप्रकारात पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.यामध्ये चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक सोहनी संदीप साळस्कर, वेशभूषा स्पर्धा द्वितीय क्रमांक दीक्षा…

error: Content is protected !!