नारळ लढविणे स्पर्धेत प्रणय घुरसाळे व रेश्मा वनस्कर प्रथम

कणकवली तालुका व शहर शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

नारळीपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुका व शहर शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटात नारळ लढवणे स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केली होती. पुरुष गटात प्रणय गुरसाळे तर महिला गटात रेश्मा वनस्कर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. पुरुष गट २. निखिल पिसे, ३. संकेत महाडिक, महिला गट २. निकिता नार्वेकर, ३. सुहासिनी लाड पुरुष गटात २० तर महिला गटात १० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण बाळू पारकर यांनी केले.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे व अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, सचिव किसन मांजरेकर, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख सुनील सावंत, दामू सावंत, सुनील हरमळकर, तालुका समन्वयक सुनील पारकर, कुडाळ तालुकाप्रमुख बंडू तुळसकर, महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, कणकवली महिला तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर, शहरप्रमुख बाळू पारकर, भास्कर राणे, कलमठ शहरप्रमुख प्रशांत वनस्कर, युवासेना तालुकाप्रमुख नीलेश तेली, बाबू आचरेकर, प्रेरणा सांगेवकर, श्रेया टकले, सरिता राऊत आदी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी भेट दिली. त्यांचे स्वागत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्यांना रोख रक्कम स्वरुपात बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!