चंद्रयान तीन च्या सॉफ्ट लँडिंग कडे संपूर्ण जगाचे लक्ष…!

चंद्रयान तीन यशस्वी होण्यासाठी देशभरातून प्रार्थना.

चंद्रयान तीन यशस्वी लॅण्ड झाल्यास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान यशस्वी उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरणार…

कणकवली/मयुर ठाकूर.

22 जुलै 2019 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चंद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले होते.संपूर्ण मोहीम यशस्वी झाल्यानंतर देखील काही किलोमीटरच्या मोजक्या अंतरावर हे यान असताना इस्रोचा संपर्क चंद्रयान 2 सोबत तुटला होता.आणि त्यानंतर यशस्वी लँडिंग होऊ शकली नाही.तरी देखील माहितीनुसार चंद्रयान दोन हे चंद्रावर काही प्रमाणात मर्यादित कार्य करीत होते.2023 मध्ये भारतीय इस्त्रोने अशाच प्रकारचे चंद्रयान 3 लॉन्च केले. चंद्रयान 2 या मोहिमेत राहिलेल्या सर्व उनिवा भरून काढत परिपूर्णतेने चंद्रयान 3 च्या यानाची बांधणी करण्यात आली.चंद्रयान 3 चे सतीश धवन,अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा येथून 14 जुलै 2023 शुक्रवार रोजी सुमारे 2.35 च्या दरम्यान दरम्यान चंद्रावर मार्गक्रमन करण्यात आले.आज 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय वेळेनुसार सुमारे सहा वाजून चार मिनिटांपर्यंत हे यान चंद्रावर उतरेल अशी माहिती मिळत आहे.चंद्रयान तीन हे उतरण्यास काही अडथळे निर्माण झाल्यास यांनाला उतरविण्याची वेळोमर्यादा वाढू शकते. परंतु प्राप्त माहितीनुसार आजच हे यान यशस्वी उतरेल अशी अपेक्षा आहॆ.इस्रोच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून हे या यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश असेल. त्यामुळे चंद्रयान तीन हे यशस्वी लँड व्हावे यासाठी देशातून प्रार्थना केल्या जात आहेत आणि सर्वांचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.

error: Content is protected !!