तेंडोली येथे २७-२८ रोजी आरती आणि नामस्मरण सप्ताह कार्यक्रम

विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यात तेंडोली येथील श्री देव रवळनाथ मंदीरात २७ व २८ ऑगस्ट रोजी आरती व नामस्मरण सप्ताह कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, श्री देव रवळनाथ मूर्तीवर सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत दुधाचा अभिषेक होणार आहे. त्यानंतर वे. मू. विष्णू करंबेळकर व त्यांचे वेदमूर्ती साहाद्याही, वे. मू चैतज्ञ जोशी व राजापूर परिसरातील नामवंत वेदमूर्ती यांच्या आरतीचे सादरीकरण होणार आहे.
२८ रोजी सकाळी ८ वाजता श्री. देव रवळनाथ मूर्तीवर अभिषेक व महापूजा, 9 वाजता महादेव मंदिरातील पिंडीवर दुधाचा अभिषेक, १० वाजता श्री देव ब्राह्मण मंदिरकडून उत्सवस्थानी नामस्मरण गजरात दिंडी येणार आहे. दुपारी १२.३० वाजता नैवेद्य व आरती, दुपारी १.३० ते रात्री 10 पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता वे.मू. श्रीपाद मुंडले, व सिंधुरत्न वे.मू. मुरवणे गुरुजी यांचा सत्कार होणार आहे. रात्री ८ वाजता श्री देवी सातेरी मंदिरात कै. बाबा गांवकर व कै. यशवंत राऊळ यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. ८.१५ वाजता शारदीय आराधना तथा मान्यवरांचे सत्कार होणार आहेत. 10 वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार मंडळ, तळवडे यांचे “देवी मुकाम्बिका” नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेंडोली देवस्थान सर्व मानकरी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमिती व उद्योजक बापू नाईक यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!