हुमरमळा (वालावल) ची घरकुल यादीच जि प ने केली गहाळ !

सरपंच, उप सरपंचांसह अतुल बंगे यांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

गेल्यावर्षी सुद्धा याच कारणांसाठी केले होते उपोषण

आता यादी मिळेपर्यंत उपोषण करणार

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ही एकमेव जिल्ह्यातील ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीने पाठवलेली गरीबांची ड यादी जवळपास पंचवीस लोकांची यादी गहाळ करण्याचा विश्वविक्रम जिल्हा परिषदेने केला असल्याचे अतुल बंगे यांनी म्हटले आहे. गेली चार वर्षे पाठपुरावा करुन आश्वासनापलीकडे काहीच नाही म्हणून १५ ऑगस्ट २०२३ रोजी जि प भवनासमोर सकाळी ८वाजल्यापासुन लाभार्थीसह बेमुदत उपोषणाचा इशारा अतुल बंगे यांच्यासह सरपंच सौ अर्चना, बंगे आणि उपसरपंच स्नेहल सामंत यांनी दिला आहे.
या वेळी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपूर्वी हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने गरीबांची ड यादी पाठवुन ती जि प सिंधुदुर्ग यांच्या कडुन गहाळ झाल्याचा संशय होता. म्हणून पुनःश्च आमच्या लाभार्थी यादी पाठवुन न्याय द्यावा अशी मागणी आम्ही गेल्या चार वर्षांपासून करत असताना गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आम्ही लाभार्थी सह बेमुदत उपोषणाला जि प समोर बसलो होतो यावेळी एका महीन्यात यादी मंजूर करतो असे आश्वासन मंत्री आणि उपमुख्यकार्यकारी, राजेंद्र पराडकर यांनी आश्वासन दिले होते. परंतु आज एक वर्ष पुर्ण होत आले लाभार्थी आजही वंचित असुन ग्रामपंचायतीकडे सतत विचारणा करत असतात म्हणून नाईलाजाने पुन्हा बेमुदत उपोषणाला बसावे लागत आहे. १२ ऑगस्ट २०२३ पुर्वी ड यादी मंजूर करावी न पेक्षा १५ ऑगस्ट २०२३ सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भवना समोर बेमुदत उपोषणाला बसत असल्याचा इशारा अतुल बंगे,सौ अर्चना बंगे, श्री स्नेहल सामंत यांनी दिला आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!