कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केल्या भावना
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यासह उपभियंता के. के. प्रभू, विनायक जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
कणकवली/ प्रतिनिधी





