धोकादायक खड्डा ‘बांधकाम’ला दिसत नाही का?

वाहनचालकांचा प्रश्न; दोडामार्ग आयी मार्गावरील खड्डयामुळे अपघाताची भीती
दोडामार्ग आयी मार्गावरील बाजारपेठेतील धोकादायक खड्डा बांधकाम विभागाला दिसत नाही की दिसून ते न बघितल्यासारखे करताहेत असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.विशेष म्हणजे त्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण झाल्यावर भागू पटकारे यांच्या घरासमोरील रस्त्यात लगेचच तो खड्डा पडला होता; पण हमी कालावधी व काम अपूर्ण असूनही त्याकडे ना ठेकेदाराने लक्ष दिले ना बांधकामच्या पर्यवेक्षकाने.त्यामुळे पावसाचे पाणी साचले की तो खड्डा लक्षात येत नाही आणि वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत.शिवाय अनेकजण खड्डा चुकवण्यासाठी वाहने खड्ड्याच्या उजव्या म्हणजेच चुकीच्या बाजूने हाकतात त्यामुळे जीवाघेणा अपघात घडण्याची भीती आहे.बांधकाम विभागाने तो खड्डा पावसाळी डांबर किंवा दगडाचा वापर करून बुजवावा अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
दोडामार्ग l प्रतिनिधी





