सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात एडमिशन सेंटर होणार !
व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांचे प्रतिपादन
विकास प्रकल्पात राजकारण नको हर्षवर्धन साबळे यांनी सिंधुदुर्ग वासियांना केले आवाहन,आई कोकणातील असल्याने आईच्या प्रेमाखातर हे प्रकल्प कोकणात राबवत आहे.
सावंतवाडी : तंत्रज्ञान शेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने कोकणात सावंतवाडी येथे पहिले बिपिओ सुरू केले आहे. यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी दिली. मुंबई युनिव्हर्सिटीचे सब सेंटर सावंतवाडीत सुरू केले असून व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन यांनी इफ्रास्ट्रक्चर आणि टेक्निकल सुविधा पुरविली असल्याची माहिती हर्षवर्धन साबळे यांनी दिली.कोकण बद्दल मला नितांत प्रेम आहे कारण माझी आई ही मूळची कोकणातली आणि म्हणूनच कोकणातील विद्यार्थ्यांसाठी कोकणातील तरुणांसाठी काहीतरी करावं या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करते त्यामुळे एकूणच या विकास प्रकल्पात कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करूया अस आवाहन आणि विनंती यावेळी हर्षवर्धन साबळे यांनी केली आहे. कोकणात रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. मात्र इथे येणाऱ्या कंपन्या या मुंबई पुणे गोवा येथीलही असतील त्यामुळे ज्यांना जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी जॉब दिले जातील तसेच आपल्या शैक्षणिक पात्रता व आलेल्या कंपन्या यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी अर्ज सादर करावेत रोजगार मेळाव्या बरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. आणि या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल असा विश्वास यावेळी हर्षवर्धन साबळे यांनी व्यक्त केला यावेळी श्री.साबळे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे सेंटर होणार असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशा प्रकारची सेंटर होणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण विषयक कोर्सेस कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांना प्रदान करणार असल्याचे हर्षवर्धन साबळे यांनी स्पष्ट केले. व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगगाराच्या संधी येथील स्थानिक युवक – युवतींना देण्यात आल्या आहेत. तर कंपनीकडून सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाल्याचे हर्षवर्धन साबळे यांनी सांगितले. तसेच ५ जानेवारी २०२३ रोजी व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या दाखल झाल्या होत्या. त्यातून येथील स्थानिकांना १० ते २५ हजार वेतन असलेले रोजगार मिळाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कुडाळ येथे लवकरच सर्वात मोठे हायड्रा हे डाटा सेंटर उभारण्यात येणार आहे हे भारतातील महत्वाचे सेंटर ठरेल अशी घोषणा यावेळी संचालक हर्षवर्धन साबळे यांनी केली. याद्वारे स्थानिकांना तसेच कोकणातील नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच २७ डिसेंबर २०२२ रोजी गोवा – पणजी येथे सुरू झालेल्या डाटा सेंटर मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळाला असल्याची त्यांनी सांगितले. कोकणात हे सगळे प्रकल्प राबविण्यामागे माझा एकच हेतू आहे तो म्हणजे माझी आई मुळची कोकणातील… त्यामुळे मला कोकण बद्दल अतिव प्रेम आहे. इथल्या तरुणांसाठी इथल्या महिलांसाठी काही उपक्रम राबवावेत या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करत आहे पुढच्या काळात विविध प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून आपण कोकणात आणू यासाठी मला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोणीही यात राजकारण करू नये अशा प्रकारचं नम्र आवाहन यावेळी हर्षवर्धन साबळे यांनी केले आहे. यावेळी बोलताना श्री हर्षवर्धन साबळे म्हणाले गेल्या काही वर्षात ऍडमिशन सेंटरने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प राबवले आहेत यात कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेतलेले नाही कंपनी स्वतःच्या खर्चातून हे सगळे उपक्रम राबवत आहे मुंबई विद्यापीठाला सुद्धा मोफत जागा उपलब्ध करून दिलेली आहे हे करत असताना कोणत्याही प्रकारच सरकारी अनुदाना न घेता ऍडमिशन सेंटर हे प्रकल्प राबवत आहे अशाच प्रकारचे प्रकल्प भविष्यातही आम्ही राबविणार आहोत. कोणत्याही प्रकारची सरकारी अनुदान घेणं हा कंपनीचा उद्देश नाही तर इथल्या तरुणांना काम देणे या एकमेव उद्देशाने कंपनी काम करत असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे अस नम्र आवाहन श्री साबळे यांनी केल आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी ही कंपनी केव्हाही बांधील नव्हती आणि यापुढे सुद्धा राहणार नाही अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.